ड्रायव्हिंग लायसन्स’बाबत नवा नियम महाराष्ट्रात लागू..
![चित्र](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh6AnpsGyUlYk6jlBwbJF83ukr1YkNcL_lufqOclffZSoz6Pzah9ise_JLZgkEmLstFDBAUG_bF3W6NKvlkOyTa87nVFNdYNo0RKHn1o08CW8iFseX2kWjrvsDDASRUR9fd6p-Aol2KfuQ/s1600/1572355372752537-0.png)
महाराष्ट्रात वाहन परवान्याबाबत मोटार वाहन (दुरुस्ती) कायद्यांतर्गत नवीन नियम लागू करण्यात आला आहे. वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) कालबाह्य झाल्यानंतर वर्षभराच्या आत परवान्याचं नुतनीकरण न केल्यास तुम्हाला चांगलाच दंड पडेल असे दिसत आहे.कारण खालील नवीन नियम महाराष्ट्रात लागू झालेला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, “आम्ही सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत काम करण्यास बांधील आहोत. महाराष्ट्राने राज्यातील सर्व 50 आरटीओमध्ये हा नवीन नियम लागू केला आहे” असे अधिकाऱ्यांनी कळविले आहे. नव्या नियमांनुसार, परवान्यासाठी तुम्हाला आता पुन्हा सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. बायोमेट्रिक करावे लागेल आणि लर्निंग टेस्टदेखील द्यावी लागेल. अनेक लोकांना अद्याप नवे नियम माहित नाहीत, ते नव्या नियमांबाबत अनभिज्ञ आहेत. जर आपला ड्रायव्हिंग परवाना एका वर्षापेक्षा अधिक कालबाह्य झाला तर आपल्याला लर्नर (प्रशिक्षणार्थी) म्हणून घेतले जाईल. याचा अर्थ आपल्याला पुन्हा एकदा लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल आणि नंतर कायम परवान्यासाठी 30 दिवस प्रतीक्षा करावी लागेल. जर कालबाह्य परवान्यासह वाहन...