ड्रायव्हिंग लायसन्स’बाबत नवा नियम महाराष्ट्रात लागू..

महाराष्ट्रात वाहन परवान्याबाबत मोटार वाहन (दुरुस्ती) कायद्यांतर्गत नवीन नियम लागू करण्यात आला आहे. वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) कालबाह्य झाल्यानंतर वर्षभराच्या आत परवान्याचं नुतनीकरण न केल्यास तुम्हाला चांगलाच दंड पडेल असे दिसत आहे.कारण खालील नवीन नियम महाराष्ट्रात लागू झालेला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, “आम्ही सुधारित मोटार वाहन कायद्यांतर्गत काम करण्यास बांधील आहोत. महाराष्ट्राने राज्यातील सर्व 50 आरटीओमध्ये हा नवीन नियम लागू केला आहे” असे अधिकाऱ्यांनी कळविले आहे. नव्या नियमांनुसार, परवान्यासाठी तुम्हाला आता पुन्हा सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. बायोमेट्रिक करावे लागेल आणि लर्निंग टेस्टदेखील द्यावी लागेल. अनेक लोकांना अद्याप नवे नियम माहित नाहीत, ते नव्या नियमांबाबत अनभिज्ञ आहेत.
जर आपला ड्रायव्हिंग परवाना एका वर्षापेक्षा अधिक कालबाह्य झाला तर आपल्याला लर्नर (प्रशिक्षणार्थी) म्हणून घेतले जाईल. याचा अर्थ आपल्याला पुन्हा एकदा लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल आणि नंतर कायम परवान्यासाठी 30 दिवस प्रतीक्षा करावी लागेल. जर कालबाह्य परवान्यासह वाहन चालविताना पकडले गेले असेल तर 500 रुपये दंड करण्याची तरतूद आहे.
आता नव्या नियमांनुसार, मूळ स्थानाचे रहिवासी प्रमाणपत्र आणि आधार कार्ड प्रत जमा करुन तुम्ही महाराष्ट्रात कुठूनही ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकतात. अशाचप्रकारे, जर तुम्ही मुंबईत कार बुक केली असेल तर तुम्ही तुमच्या पत्त्याचा( होम टाऊन) पुरावा देऊन शहर आरटीओमध्ये नोंदणी करू शकतात.केंद्र सरकारनं ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल) तयार करण्याचे नियम आणखी सोपे केले आहेत. आता पूर्ण देशात ड्रायव्हिंग लायसन्स(डीएल) आणि वाहनांचं नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आता एकसारखंच मिळणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक राज्यात डीएल आणि आरसी बुकचा रंग एकसमानच असणार आहे आणि त्यातील माहितीही जवळपास सारखीच राहणार आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हालाinamdars257@gmail.com या इमेल आयडी वर पाठवू शकता

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

RBI Approved Low Credit Score Loan Apps 2023: फ़ोन से ₹5 लाख कम सिबिल पर लोन, आज ही करें Instant Loan Apply

Koka kola ka sirf do log jante he also formula