म्हणून १४ लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं

 


“थू तुमच्या जिंदगानीवर”

भारताचं नागरिकत्व सोडणाऱ्या नागरिकांच्या मुद्द्यावरही आंबेडकरांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “१९५० ते २०१४ या कालावधीत भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व घेणारे ७ हजार ६४४ हिंदू कुटुंबे आहेत. २०१४ ते २०२३ या कालावधीत ज्यांची मालमत्ता किमान ५० लाख रुपये आहे अशा १४ लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारलं. अन हे हिंदूराष्ट्र करायचं म्हणत आहेत, थू तुमच्या जिंदगानीवर.”

“…म्हणून १४ लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं”

“या मूर्ख नालायक सरकारच्या नादी आम्हाला लागायचं नाही. आम्हाला आमच्या बापजाद्यांची इभ्रत वाचवायची आहे. म्हणून आम्ही नागरिकत्व सोडलं, असे परदेशी गेलेले भारतीय म्हणत असतात. भाजपाने या १४ लाख लोकांवर गुमनाम जगण्याची वेळ आणली आहे. आतापर्यंत आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला नाही, पण या निवडणुकीमध्ये आम्ही सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही,” असंही आंबेडकरांनी नमूद केलं.

हेही वाचा : सांगलीत वंचितच्या मंचावर टिपू सुलतानची प्रतिमा, भरसभेत पोलिसांना इशारा देत प्रकाश आंबेडकर म्हणाले…

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते इम्तियाज नदाफ, राज्य उपाध्यक्ष दिशा पिंकी शेख, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, संतोष सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vba chief prakash ambedkar criticize narendra modi bjp rss in sangli pbs

First published on: 30-11-2023 at 11:49 IST
NEXT STORY
LIVE

Maharashtra Breaking News Live: संजय राऊतांनी राहत इंदौरींचा ‘तो’ शेर केला पोस्ट; तर्क-वितर्कांना उधाण!

Maharashtra Political News Live Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

Maharashtra Marathi Batmya Live Today in Marathi - Sanjay Raut
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट

Latest Marathi News Live Update, 30 November 2023: राज्यात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण असा आरक्षणाचा वाद चालू असताना दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर चालू असलेल्या आमदार अपात्रता सुनावणीचीही जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. त्यातच दत्ता दळवींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या विधानामुळे त्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकारण सुरू झालं आहे.

namrata sambherao shared photo with vanita kharat and onkar bhojane
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव, वनिता खरात आणि ओंकार भोजने पुन्हा एकत्र, ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष
Maharashtra Political News Live Updates
Maharashtra News: “संजय राऊत लिहिताना चिलीम आणि बोलताना…”, आशिष शेलारांची टीका
moratorium on tourism development schemes has been lifted
Maharashtra News : “पंतप्रधानांनी NCP ला ‘नॅचरल करप्ट पार्टी’ म्हटलं होतं, पण…”, तटकरेंचं विधान
nilesh rane influenza
Maharashtra News : निलेश राणेंना इन्फ्लुएन्झा व्हायरसची लागण; ट्वीटमध्ये म्हणाले, “मी कधीच खासगी आयुष्याबद्दल…!”
Live Updates

Today’s Breaking News Live Updates: महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा वाद चिघळला.

16:03 (IST) 30 Nov 2023
डोंबिवली जवळील पलावा भागात अंमली पदार्थ जप्त, दोन जण अटकेत

डोंबिवली – कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील पलावा सिटी भागात मंगळवारी एम. डी. या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेल्या दोनजणांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच लाखांहून अधिक किमतीची एम. डी. पावडर पोलिसांनी जप्त केली आहे.

सविस्तर वाचा…

15:13 (IST) 30 Nov 2023
सोने मिळाले… पण मालकाचा शोध लागेना, पोलिसांची पंचायत

सोन्याच्या मालकांचा शोध लागत नसल्याने हे सोने पोलिसांच्या मुद्देमाल कक्षात पडून आहे.

सविस्तर वाचा…

15:02 (IST) 30 Nov 2023
बोईसर : बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगा गंभीर जखमी

तारापुर जवळील कुडण येथे एका सात वर्षीय शाळकरी मुलावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वाचा…

14:56 (IST) 30 Nov 2023
प्रकाश आंबेडकरांना अटक करण्याची नारायण राणे यांची मागणी : म्हणाले, ‘दंगली होतील हे आंबेडकरांना…’

आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

सविस्तर वाचा…

14:41 (IST) 30 Nov 2023
बेघर आदिवासींना दोन वर्षात हक्काचे घर, आदिवासी सेवक, संस्था राज्य पुरस्कार सोहळ्यात डाॅ. विजयकुमार गावित

नाशिक – ज्या आदिवासी बांधवांना स्वतःचे घर नाही, त्यांना दोन वर्षात हक्काचे घर देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांनी दिली. शहरातील महाकवी कालिदास कलामंदिरात आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आदिवासी सेवक आणि आदिवासी सेवा संस्था यांना २०१९ ते २०२२ या चार वर्षांच्या राज्य पुरस्कारांचे मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते वितरण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

14:39 (IST) 30 Nov 2023
Latest Marathi News Update: संजय राऊतांची सूचक पोस्ट!

संजय राऊतांनी राहत इंदौरींचा ‘तो’ शेर केला पोस्ट, तर्क-वितर्कांना उधाण!

https://twitter.com/rautsanjay61/status/1730098878907556239

14:36 (IST) 30 Nov 2023
“थू तुमच्या जिंदगानीवर”; प्रकाश आंबेडकरांचा मोदींसह भाजपा-आरएसएसवर हल्लाबोल, म्हणाले…

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा आणि आरएसएसवर सडकून टीका केली. “आरएसएस-भाजपाच्या १० वर्षांमधील सत्तेचा हिशोब मांडायला सुरुवात केली पाहिजे”, असं म्हणत त्यांनी ३५ हजार कोटी रुपयांची लूट झाल्याचा आरोप केला. ते बुधवारी (२९ नोव्हेंबर) वंचितच्या सांगलीतील ‘सत्ता संपादन सभेत’ बोलत होते.

सविस्तर वाचा…

14:35 (IST) 30 Nov 2023
वंचितच्या सभेत टिपू सुलतानच्या प्रतिमेला हार घालण्यास पोलिसांचा विरोध, भरसभेत प्रकाश आंबेडकर म्हणाले…

वंचित बहुजन आघाडीच्या सांगलीमधील सभेत मंचावर महाराष्ट्रातील सर्वच महापुरुषांची प्रतिमा ठेवण्यात आल्या. यात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्यासह टिपू सुलतान यांचीही प्रतिमा ठेवण्यात आली. या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करताना पोलिसांनी टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला हार घालू नये, असं प्रकाश आंबेडकरांना सांगितलं. त्यावर आंबेडकरांनी बुधवारी (२९ नोव्हेंबर) वंचितच्या ‘सत्ता संपादन सभेत’ पोलिसांना इशारा दिला.

सविस्तर वाचा…

14:32 (IST) 30 Nov 2023
गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण अन तीन हजार किलोची खिचडी; काय आहे वाचा…

नागपूर : खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये गुरुवारी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी तीन हजार किलोची खिचडी तयार केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार सांस्कृतिक महोत्सव नागपुरात ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरु आहे.

वाचा सविस्तर…

14:06 (IST) 30 Nov 2023
पनवेल : कळंबोलीला ट्रेलरच्या चाकाखाली झोपलेल्याला चिरडले

पनवेल : कळंबोली येथे ट्रेलरच्या चाकाखाली झोपलेल्या व्यक्तीला चिरडून ठार केल्याची घटना सोमवारी दुपारी दिड वाजता घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्त्यावर आणि गाडी रस्त्याकडेला उभी करुन झोपणा-या चालकांच्या सूरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वाचा सविस्तर…

13:54 (IST) 30 Nov 2023
Latest Marathi News Update: छगन भुजबळांचा पाहणी दौरा अर्धवट

नाशिकच्या येवला भागात नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज छगन भुजबळांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार ते दौऱ्यासाठी निघालेही. मात्र, काही मराठा संघटनांनी छगन भुजबळांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला. काही ठिकाणी भुजबळांच्या ताफ्याला काळे झेंडेही दाखवण्यात आले. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांनी दौरा अर्धवट सोडून दोन गावांमध्ये भेट न देताच परत फिरल्याचं सांगितलं जात आहे.

13:49 (IST) 30 Nov 2023
हिवाळी अधिवेशन : विधानपरिषदेत आतापर्यंत १८०० वर प्रश्न; आजपासून लक्षवेधी स्वीकारणार

नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होत आहे. या अधिवेशानासाठी तारांकित प्रश्नांचा पाऊसही पडत असून विधानपरिषदेत आतापर्यंत १८०० वर प्रश्न दाखल झाल्याची माहिती आहे, तर गुरुवारपासून लक्षवेधी सूचना स्वीकारण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा…

13:48 (IST) 30 Nov 2023
‘अमृत संस्थे’ला वालीच नाही का? खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील युवकांच्या उन्नतीसाठी…

नागपूर: खुल्या प्रवर्गातील अर्थिक दुर्बल घटकातील सर्व युवक युवतीच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राज्यशासनाची महाराष्ट्र संशोधन व उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत संस्था) २०१९ ला सुरू करण्यात आली. एक संचालक व तीन कर्मचारी हे साखर संकुल शिवाजीनगर पुणे येथे छोट्या एका खोलीत ही अमृत स्वायत्त संस्था काम करते. फक्त कागदोपत्री ही संस्था काम करत आहे का अशी शंका वाटावी अशी परिस्थिती आहे.

सविस्तर वाचा..

13:21 (IST) 30 Nov 2023
दिवाळीत ‘समृद्धी महामार्ग’वरून विक्रमी वाहनांचा प्रवास

नागपूर : सातत्याने अपघातांमुळे चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गावर दिवाळीत सर्वाधिक वाहनांनी प्रवास केल्याची माहिती पुढे येत आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या काळात पहिल्या २१ दिवसांमध्ये या महामार्गावर तब्बल १.१६ लाख जास्त वाहने धावली.

वाचा सविस्तर…

13:18 (IST) 30 Nov 2023
वसई : महापालिका करणार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण, जागा निश्चित करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न

सर्वेक्षनानंतर फेरीवाल्यांच्या जागा निश्चित होतील आणि अतिक्रमण तसेच वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळेल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा…

13:18 (IST) 30 Nov 2023
मुंबई : वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाला मोटारगाडीची धडक, हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

मुंबई : कुर्ला येथील एल.बी.एल. मार्गावर वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मोटारगाडीने धडक दिली असून या अपघातात वाहतूक पोलिसाच्या पायाचे हाड मोडले. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मोटरगाडीचालकाला पोलिसाने थांबण्याचा इशारा केला होता. मात्र मोटरगाडीचा वेग वाढवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाने पोलिसाला धडक दिली.

सविस्तर वाचा…

13:17 (IST) 30 Nov 2023
मुंबई : पुनर्विकासाच्या नावाखाली दामोदर नाट्यगृह बंद करण्याचा घाट, सहकारी मनोरंजन मंडळाचा आरोप

मुंबई : मुंबईच्या सांस्कृतिक आणि रंगभूमीवरील इतिहासाची गौरवशाली परंपरा अनुभवत शतकी वाटचाल पूर्ण केलेले दामोदर नाट्यगृह पुनर्बांधणीच्या कामासाठी १ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आले आहे. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या नावाखाली ते जमीनदोस्त करण्याचा डाव सोशल सर्व्हिस लीगने केला असल्याचा आरोप करीत सहकारी मनोरंजन मंडळाने गुरुवारी सकाळी आंदोलन केले.

सविस्तर वाचा…

13:08 (IST) 30 Nov 2023
नवी मुंबई : शेवटी पोलिसांनीच पुढाकार घेत अनधिकृत फेरीवाल्यांवर रात्री तीन वाजेपर्यंत केली कारवाई, मनपा सोबतीला

नवी मुंबई : रविवारी रात्री नेरुळ येथे अनधिकृत फेरीवाल्यांच्या आपसातील भांडणात हकनाक एका रुग्णवाहिका चालकाची निर्घृण हत्या झाल्या नंतरही मनपाला जाग आली नाही. मात्र कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीच पुढाकार घेत पूर्ण नेरुळ मध्ये पहाटे तीन पर्यंत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली.

वाचा सविस्तर…

12:52 (IST) 30 Nov 2023
समायोजनासाठी धुळ्यात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा मोर्चा

राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे ३५ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे.

सविस्तर वाचा…

12:34 (IST) 30 Nov 2023
Latest Marathi News Update: भुजबळांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

छगन भुजबळ अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी येवला दौऱ्यावर असून तिथे मराठा संघटनांनी भुजबळांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.

12:30 (IST) 30 Nov 2023
राज्यात शनिवारपासून हुडहुडी…जाणून घ्या कोणत्या ठिकाणी पारा उतरणार

दोन डिसेंबरपासून राज्यभरात किमान तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा…

12:25 (IST) 30 Nov 2023
Latest Marathi News Update: मोदींच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याचं होणार अनावरण!

४ डिसेंबर नौदलदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य पुतळ्याच अनावरण होणार आहे. तसेच या निमित्ताने राजकोट किल्ला परिसर सुशोभीकरण कामकाज देखील पूर्णत्वास आलं आहे – निलेश राणे

https://twitter.com/meNeeleshNRane/status/1730116299039359239

12:16 (IST) 30 Nov 2023
गृहमंत्र्यांच्या शहरात ऑटोरिक्षा चालकांमध्ये नियम मोडण्याची स्पर्धा

नागपूर : उपराजधानीत वाहतूक नियम मोडण्याची ऑटोरिक्षा चालकांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे. गेल्या चार वर्षांची स्थिती बघता प्रत्येक वर्षी शहरात नियम मोडणाऱ्या ऑटोरिक्षांची संख्या वाढत असल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर हे गृह शहर आहे.

वाचा सविस्तर…

12:04 (IST) 30 Nov 2023
चंद्रपूर : एसटी महिला प्रवासी वाढल्या, ३३ कोटींचे उत्पन्न

चंद्रपूर: एसटी महामंडळाने बसेसच्या तिकिटात ५० टक्के सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. २७ मार्चपासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांचा एसटीचा प्रवास वाढला आहे.

चंद्रपूर विभागातून अवघ्या सात महिन्यांत तब्बल ६६ लाख ३५ हजार महिलांनी प्रवास केला, यातून महामंडळ मालामाल झाले असून, तब्बल ३३ कोटी ४१ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

चंद्रपूर विभागात चंद्रपूर, चिमूर, राजुरा, वरोरा असे चार आगार येतात. ब्रह्मपुरी आगाराचा गडचिरोली जिल्ह्यात समावेश आहे. या चारही आगारांत महिला सन्मान योजनेचा महिलांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. सकाळपासून सांयकाळपर्यंत कोणतीही बस बघितल्यास महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय दिसून येत आहे. याउलट खासगी बसेसचे प्रवासी कमी झाले असल्याचे दिसून येत आहे.

योजना सुरू झाल्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत चंद्रपूर विभागातून ६६ लाख ३५ हजार महिलांनी प्रवास केला. यातून महामंडळ मालामाल झाले असून, तब्बल ३३ कोटी ४१ लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

11:49 (IST) 30 Nov 2023
ठाण्यात दहा दिवसांत पंधरा आगीच्या घटना

ठाणे शहरात दिवाळी पासून आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. दिवाळी नंतरही या घटनांचे प्रमाण कायम असल्याचे दिसत आहे.

सविस्तर वाचा…

11:42 (IST) 30 Nov 2023
पुणेकरांच्या जीवाशी खेळ; खडकवासला धरणात मिसळतेय दररोज एवढे सांडपाणी

जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत आणि त्यानंतर तयार केलेल्या अहवालात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

सविस्तर वाचा…

11:32 (IST) 30 Nov 2023
वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचे प्रकरण, आज उच्च न्यायालयात सुनावणी, निर्णय अपेक्षित

राज्य शासनाने २०११ रोजी वसई विरार महापालिकेतून २९ गावे वगळली होती.

सविस्तर वाचा…

11:24 (IST) 30 Nov 2023
कल्याणमधील वालधुनी नदीजवळ उड्डाण पूल; ६३९ कोटींचा प्रस्ताव ‘एमएमआरडीए’ला सादर

पालिकेने हा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सादर करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

सविस्तर वाचा…

11:14 (IST) 30 Nov 2023
Latest Marathi News Update: राजा नौटंकी, सरदारही नौटंकी – संजय राऊत

ही नौटंकी आहे. पण ज्यांचा राजाच नौटंकी आहे, त्यांचे सरदार नौटंकी असणारच. विरोधी पक्षनेते, विरोधी पक्षांचे नेते दोन दिवसांपासून गावागावात जाऊन फिरत आहेत. पण मुख्यमंत्री व त्यांचे सरकार आज जागे झाले आहे – संजय राऊत

11:13 (IST) 30 Nov 2023
Latest Marathi News Update: मुख्यमंत्र्यांची जबाबदारी खोके सुपूर्त करणं – संजय राऊत

अवकाळीचं संकट आस्मानातून कोसळत असताना आपले सुलतान आणि डेप्युटी सुलतान प्रचारात व्यग्र होते. कुणी छत्तीसगडमध्ये, कुणी तेलंगणात होते. जणूकाही ते गेले नसते तर तिथे निवडणुका थांबल्या असत्या. त्यांची मुख्य जबाबदारी होती इथून खोके नेऊन तिथल्या लोकांना सुपूर्त करायची. पण आपली ११ कोटी जनता संकटात असताना त्याबाबतीत त्यांना चिंता नाही – संजय राऊत

Maharashtra Marathi News Live Today

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट

Today’s Breaking News Live Updates: दत्ता दळवींच्या अटकेनंतर महाराष्ट्रात सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप.

Web Title: Maharashtra news live shinde vs thackeray group chhagan bhujbal maratha reservation latest marathi news weather update today pmw

First published on: 30-11-2023 at 11:10 IST

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

Mahindra maxximo 2011 model sale

Government jobs Maharashtra