म्हणून १४ लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं
“थू तुमच्या जिंदगानीवर” भारताचं नागरिकत्व सोडणाऱ्या नागरिकांच्या मुद्द्यावरही आंबेडकरांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “१९५० ते २०१४ या कालावधीत भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व घेणारे ७ हजार ६४४ हिंदू कुटुंबे आहेत. २०१४ ते २०२३ या कालावधीत ज्यांची मालमत्ता किमान ५० लाख रुपये आहे अशा १४ लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारलं. अन हे हिंदूराष्ट्र करायचं म्हणत आहेत, थू तुमच्या जिंदगानीवर.” “…म्हणून १४ लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं” “या मूर्ख नालायक सरकारच्या नादी आम्हाला लागायचं नाही. आम्हाला आमच्या बापजाद्यांची इभ्रत वाचवायची आहे. म्हणून आम्ही नागरिकत्व सोडलं, असे परदेशी गेलेले भारतीय म्हणत असतात. भाजपाने या १४ लाख लोकांवर गुमनाम जगण्याची वेळ आणली आहे. आतापर्यंत आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला नाही, पण या निवडणुकीमध्ये आम्ही सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही,” असंही आंबेडकरांनी नमूद केलं. हेही वाचा : सांगलीत वंचितच्या मंचावर टिपू सुलतानची प्रतिमा, भरसभेत पोलिसांना इशारा देत प्रकाश आंबेडकर म्हणाले… यावेळ...